ए. ए. फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या 'जंगजौहर' या चित्रपटाची निर्मिती आलमंड्स क्रिएशन्सच्या बॅनरखाली निर्माते अजय-अनिरूद्ध यांनी केली आहे. 'फर्जंद' आणि 'फत्तेशिकस्त' या चित्रपटांना मिळालेलं यश आणि प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादानंतर दिग्पाल लांजेकरनं 'जंगजौहर' चित्रपटाच्या रूपात 'शिवराज अष्टका'तील तिसरे पुष्प शिवचरणी अर्पण करण्याचा विडा उचलला. चित्रपटरूपी तिसरे पुष्प रसिक दरबारी सादर करायला काही अवधी असतानाच या चित्रपटाशी निगडीत एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. 'जंगजौहर' हे या चित्रपटाचं शीर्षक बदलून आता 'पावनखिंड' करण्यात आलं आहे. यासोबतच हा चित्रपट येत्या १० जून रोजी प्रदर्शित होणार असल्याची अधिकृत घोषणाही करण्यात आली आहे.
#Lokmatcnxfilmy #Jungjauhar #DigpalLanjekar #Mrinalkulkarni #Chinmaymandlekar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber